-
VI ने आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये एक नवीन स्वस्त प्लॅन सामील केला.
-
Vodafone Idea च्या नवीन प्लॅनची किंमत 23 रुपये आहे.
-
23 रुपयांच्या या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 1.2GB डेटा मिळेल.
Vodafone Idea (Vi) ही भारतीय दूरसंचार उद्योगातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. होय, Jio आणि Airtel नंतर व्होडाफोन आयडियाचे नाव घेतले जाते. ही कंपनी सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सतत चर्चेत आहे. दरम्यान, आता VI ने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी आणखी एक स्वस्त पर्याय सादर केला आहे. VI ने आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये एक नवीन स्वस्त प्लॅन सामील केला आहे.
कंपनीने नवा प्लॅन अवघ्या 23 रुपयांमध्ये लाँच केला आहे. चला तर मग जाणून घेऊयात स्वस्त आणि मस्त प्लॅनची किंमत आणि बेनिफिट्स.
Vodafone Idea चा 23 रुपयांचा प्लॅन
Vodafone Idea च्या नवीन प्लॅनची किंमत 23 रुपये आहे. खरं तर, हा VI चा एक नवीन डेटा प्लॅन आहे, जो वापरकर्त्यांच्या अतिरिक्त डेटा गरजा पूर्ण करेल. 23 रुपयांच्या या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 1.2GB डेटा मिळतो, ज्याची वैधता संपूर्ण 1 दिवसापर्यंत आहे. हा एक डेटा प्लॅन असल्यामुळे हा प्लॅन वापरण्यासाठी तुम्हाला वेगळ्या बेस प्लॅनची आवश्यकता असेल. कंपनीकडे या किंमत श्रेणीमध्ये अजूनही अप्रतिम प्लॅन्स उपलब्ध आहेत.
VI चा 19 रुपयांचा प्लॅन
तुमच्या माहितीसाठी लक्षात घ्या की, कंपनीच्या प्रीपेड पोर्टफोलिओमध्ये 19 रुपयांचा डेटा प्लॅन आधीच उपस्थित आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 24 तासांच्या वैधतेसह 1GB डेटा दिला जातो. नवीन प्लॅन वापरकर्त्यांना 4 रुपये अतिरिक्त देऊन 200MB अधिक डेटा देत आहे. ज्या वापरकर्त्यांना एका दिवसासाठी 1GB पेक्षा जास्त डेटा आवश्यक आहे ते 23 रुपयांचा हा नवीन प्लॅन सक्रिय करू शकतात.
VI चा 24 रुपयांचा प्लॅन
VI आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये 24 रुपयांचा विशेष डेटा प्लॅन देखील आणते. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड डेटाचा ऍक्सेस दिला जातो. मात्र, विशेष बाब म्हणजे VI च्या या प्लॅनची वैधता फक्त 1 तासाची आहे. म्हणजेच 24 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्ते 1 तासात अमर्यादित डेटा वापरू शकतात.